विवेक साहित्य मंच आणि नुक्कड कथाविश्व यांनी आयोजित केलेलं यंदाचं नुक्कड साहित्य संमेलन पुण्याच्या फर्ग्युसन महाविद्यालयात दिनांक २ जानेवारी रोजी पार पडलं. ‘साहित्यसम्राज्ञी शांता शेळके जन्मशताब्दी विशेष’ म्हणून हे संमेलन साजरं केलं गेलं. कौशल संमेलनाच्या शेवटच्या सत्रातल्या संगीताच्या कार्यक्रमासाठी अध्यक्ष म्हणून उपस्थित होता. चैत्राली अभ्यंकर आणि त्यांच्या सहकार्यांनी अतिशय सुंदर कार्यक्रम सादर केला. कौशलने या प्संरसंगी पूर्ण संमेलनाचं समारोपाचं भाषण केलं.