भांडारकर प्राच्य विद्या संशोधन मंदिर, पुणे आणि हेरिटेज इंडिया कम्युनिकेशन्स प्रा. लि. प्रस्तुत ‘मंथन’ या मालिकेत ‘संगीत – एक समर्थ संवाद माध्यम’ हा कार्यक्रम होणार असून, या कार्यक्रमात स्नेहल दामले संगीतकार कौशल इनामदार यांच्याशी संवाद साधतील. कार्यक्राम ८ जुलैला सायं ६ वा भांडारकर प्राच्यविद्या संशोधन मंदिराच्या समवसरण ॲम्फि-थिएटरमध्ये होईल.