थोडं माझ्याबद्दल

मी कौशल श्रीकृष्ण इनामदार, संगीतकार व्हायच्या प्रयत्नात आहे. प्रत्येक टप्प्याला वाटतं आपण आपल्या ध्येयाच्या जवळ येतोय्‍ तर ध्येय आणखीन लांब गेल्याचा भास होतो. आता कुठे मला या खेळाची मजा येऊ लागली आहे. हा सगळा उपक्रम क्षितिजाला वश करण्यासारखा आहे हे ही समजतय्‍ आणि खरी गंमत ही प्रवासात आणि पाठलागात आहे हे ही थोडं थोडं समजतय्‍! असो. ही दमछाक होत असताना जर थोडं विसावून तुम्हाला सुद्धा या प्रवासाच्या गमतीजमती सांगितल्या तर बिघडलं कुठे? उलट काही निसटलेल्या गोष्टी ध्यानात येतील असंच वाटतय्‍.