‘प्रतिभा’ ही काही सर्वसामान्यपणे आढळणारी गोष्ट नाही. फार म्हणजे फारच कमी कलाकार ‘प्रतिभावंत’ म्हणावे असे असतात. कुठल्याही चांगल्या कलाकाराला कधीतरी या प्रतिभेचा स्पर्श झालेला असतो. कुणाला तोही न होता, प्रतिभेचं नुसतंच ओझरतं दर्शन होतं. पण प्रतिभा (‘जिनियस’ या अर्थी) ही एक चंचल स्वामिनी आहे. कमालीचे प्रतिभावंत कलाकारही तिच्या मर्जीची खात्री […]