काही बोललीस का?

Kahi Bolalis Ka – Shubhra Kalya Moothbhar

“शुभ्र कळ्या मूठभर” या अल्बम मधलं “काही बोललीस का?” हे गाणं माझ्या भावाने, विशालने अतिशय सुंदर चित्रित केलं आहे. अविनाश नारकर आणि ऐश्वर्या नारकर यांनी अभिनय केलेल्या या व्हिडियोची व्हिडियोग्राफी शिरीष देसाई यांची आहे आणि संकलक आहेत प्रेषित जोशी. गीत शांताबाई शेळकेंनी लिहिलेलं आहे आणि आवाज आहेत रंजना जोगळेकर आणि ऋषिकेश कामेरकर यांचे. आपल्या प्रतिक्रियांचं स्वागत आहे.

7 Comments

  1. Girish Vaishampayan says:

    अतिशय सुंदर गाणे…आणि तितकेच छान चित्रण !! अप्रतिम…!!!

  2. Ajay says:

    सुंदर गाणं. उत्तम छायाचित्रण आणि संकलन. खास करुन मोनोटोन आणि रंगित चित्रणाचा केलेला वापर. चाळिच्या एन्ट्री जवळ ठेवलेली झाकलेली स्कुटर गाण्यात दोनदा दिसते ( येकदा ते डेट वरुन येताना मोनोटोन मधे आणि येकदा शेवटी )मात्रं मधली येव्हढी वर्ष गेलि तरि ती त्याच जागी अगदी तशीच दिसते हे खटकतं. तसच गाण्याच्या सुरुवाती पासुन लिपसिंक न कर्ता पुढच्या कडव्यापस्सुन केलं असत तर आधि मुकं पणे केलेले इशारे आनी उतार्वयात ला मुकपणा चांगला अधोरेखित झाला असता असं वाट्तं
    धन्य्वाद

  3. कौशल
    मागच्या आठवड्यात प्रोग्राम पाहिला टिव्हीवर.. छान झाला कार्यक्रम. पण प्रत्येक वेळी लिल चॅम्प्स बरोबर कम्परिझन होतेच. ते कधीही चांगले गातात. भेलांडे चा.. जाउ दे.. शुभेच्छा..

  4. By the way Song is GooooooD! keep it up!!

  5. sahajach says:

    गाणे खुपच छान आहे…..वातावरणामुळे आमच्या नासिकच्या जुन्या वाड्यात गेल्यासारखे वाटले…..
    तुम्हाला T.V. वर अनेकदा पाहीले आहे पण प्रत्यक्षात अशी प्रतिक्रीया देऊ शकेन असे वाटले नव्हते….
    लिखाण मनापासुन आवडले…तुमच्या गाण्यांसारखेच सुरेल आहे ते!!
    तन्वी

  6. ती स्कूटर मुद्दामहून तशी घेतली. आमच्या आजीच्या वाड्यात एक गृहस्थ राहायचे, त्यांची स्कूटर वर्षानुवर्षे अशीच धूळ खात पडली असायची. वर्षातून एकदा ते ती स्वच्छ करायचे! पण मी मोठा होईपर्यंत त्या स्कूटरने आपली जागा काही सोडली नाही!! चाळींमध्ये काही गोष्टी अजिबात बदलत नाहीत… इतक्या की त्या शाश्वत आहेत की काय अशी शंका येऊ लागते! त्यापासून प्रेरित होऊन ती स्कूटर विशालने या व्हिडियोच्या कला दिग्दर्शकाला फ्रेममध्ये ठेवायला सांगितली होती! जुन्या, मळकट कव्हर मध्ये!!

  7. प्रिय कौशल,
    हे गाणं मी आधीही ऐकलं होतं पण आत्ता वर्डस्पेसवर ऐकताना राहवलं नाही म्हणून गुगल केल्यावर इथे येऊन पोचलो आणि सुखद धक्का बसला व समजलं की ही तुझी निर्मिती आहे. गाणं उत्कृष्टच जमलं आहे. आजच्या काळातील इतर गाण्यांच्या मानाने याचं असं वैशिष्ट्य मला वाटतं की याची सुंदर, गोड चाल व ओघवते, अकर्कश, सौम्य संगीत हे या गाण्याच्या काव्यात जो काळ ध्वनित (imply) करण्याचा प्रयत्न केला आहे त्याला अचूकपणे शोभते. शांताबाईंनी हे गीत साधारण कुठल्या वर्षी लिहिले असावे?
    आणि तुझ्या तावडीत सापडेपर्यंत बरे कोरे, अस्पृश्य राहिले!! नाहीतर आजच्या संगीत पद्धतीप्रमाणे कोणीतरी याचे काव्य वाद्यांच्या कोलाहलात दबवून टाकले असते. तुझे आभार.

What do you think?