गाणं

July 16, 2015

एक साहित्यिक वारी

वारीचे दिवस पुन्हा सुरू झाले आहेत. काही वर्षांपूर्वी पंढरपूरच्या वारीची माहिती देणाऱ्‍या एका संकेतस्थळाचं माझ्या हस्ते पुण्याच्या एस्.एम्. जोशी सभागृहात उद्घाटन झालं. एका अध्यात्मिक विषयावर, आधुनिक तंत्रज्ञानाच्या साह्याने केलेल्या संकेतस्थळाचं, एका समाजवादी नेत्याच्या नावावर असलेल्या सभागृहात उद्घाटन होतं – हे फक्त भारतातच होऊ शकतं! पण जे परमेश्वराला मानत नाहीत ते त्याच्या (तिच्या) संतांना मात्र मनापासून मानतात […]
August 30, 2014
होऊनिया पार्वती मळिते मी गणपती

होऊनिया पार्वती मळिते मी गणपती…

महाराष्ट्रात संगीतकार म्हणून मान्यता मिळवायला जे तीन प्रकार ‘मॅन्डेटरी’ समजले जातात ते म्हणजे – भावगीत, लावणी, आणि गणपतीचं गाणं! संगीतकार म्हणून १९ वर्षाच्या माझ्या कारकीर्दीत मी या तीन प्रकारातला भावगीत सोडला तर इतर दोन प्रकार हाताळले नव्हते. नाही म्हणायला ‘बालगंधर्व‘ या चित्रपटात ‘नेसली पितांबर जरी’ या पारंपारिक लावणीचा पुनर्निर्माण करण्याचा […]
August 9, 2014

सूर आणि संस्कृती

कुठूनसे भटियारचे सूर कानावर आले आणि मला जाग आली. पडदे लावलेलेच होते, पण भटियारमुळे सकाळचं वातावरण तयार झालं होतं. मग पडदे उघडले आणि सूर्याची कोवळी किरणं खोलीत सांडली. आपल्या रागसंगीतामध्ये प्रहराप्रमाणे राग गायले जातात याचं मला अगदी पहिल्यापासून कुतूहल आहे. भैरव, ललत, सकाळीच का? मारवा, पूर्वी संध्याकाळीच का? असे अनेक […]
March 15, 2013

मराठी अभिमानगीतामध्ये शेवटच्या चार ओळी का नाही घेतल्या ?

यंदाच्या २७ फेब्रुवारीला – मराठी भाषा दिनी मराठी अभिमानगीताच्या प्रकाशनाला ३ वर्ष पूर्ण झाली आणि पुन्हा एकदा यूट्यूबवर असलेल्या मराठी अभिमानगीताकडे लोकांचा ओघ वाढला. मराठी लोकांचा या गीताला भरभरून प्रतिसाद मिळाला. कौतुकाचा वर्षाव जसा या गीतावर झाला तसेच काही प्रश्नही उपस्थित केले गेले. त्यातला वारंवार विचारला जाणारा प्रश्न म्हणजे मराठी […]