संगीत

August 16, 2014

या शुभ्र विरल अभ्रांचे…

मराठी चित्रपट आणि भावगीतांमध्ये प्रेमाच्या वेगवेगळ्या विभ्रमांना जे स्थान आहे, कदाचित तेच स्थान निसर्गाला आहे. अनेक निसर्गगीतं आपल्या परिचयाची आहेत. बर्‍याच निसर्गगीतांमध्ये निसर्ग हा मानवी भावनांसाठी रूपक म्हणून वापरल्याचं आपल्याला आढळतं. निसर्गाच्या रूपकांमधून मानवी संबंधांचा व्यवहार काव्यात्म पद्धतीने मांडलेला दिसतो. उदाहरणार्थ – फिटे अंधाराचे जाळे झाले मोकळे आकाश दरीखोर्‍यातून वाहे […]
August 9, 2014

सूर आणि संस्कृती

कुठूनसे भटियारचे सूर कानावर आले आणि मला जाग आली. पडदे लावलेलेच होते, पण भटियारमुळे सकाळचं वातावरण तयार झालं होतं. मग पडदे उघडले आणि सूर्याची कोवळी किरणं खोलीत सांडली. आपल्या रागसंगीतामध्ये प्रहराप्रमाणे राग गायले जातात याचं मला अगदी पहिल्यापासून कुतूहल आहे. भैरव, ललत, सकाळीच का? मारवा, पूर्वी संध्याकाळीच का? असे अनेक […]
March 15, 2013

मराठी अभिमानगीतामध्ये शेवटच्या चार ओळी का नाही घेतल्या ?

यंदाच्या २७ फेब्रुवारीला – मराठी भाषा दिनी मराठी अभिमानगीताच्या प्रकाशनाला ३ वर्ष पूर्ण झाली आणि पुन्हा एकदा यूट्यूबवर असलेल्या मराठी अभिमानगीताकडे लोकांचा ओघ वाढला. मराठी लोकांचा या गीताला भरभरून प्रतिसाद मिळाला. कौतुकाचा वर्षाव जसा या गीतावर झाला तसेच काही प्रश्नही उपस्थित केले गेले. त्यातला वारंवार विचारला जाणारा प्रश्न म्हणजे मराठी […]
June 30, 2010

खिडकीएवढे आभाळ

(हा लेख ‘सकाळ’ मध्ये ‘गुड मॉर्निंग’ या सदरात दि. ३० जून रोजी छापून आला आहे.) हे सगळे लेख मी माझ्या खोलीत संगणकावर लिहितो. समोर संगणकाचा स्क्रीन आणि उजव्या हाताला एक खिडकी असं एकंदर नेपथ्य या सगळ्या लेखनप्रक्रियेला लाभलेलं आहे. जरा कंटाळा आला किंवा सुचेनासं झालं की मी या खिडकीबाहेर एक […]
January 31, 2010

रात्रीचा चहा

  मराठी अभिमानगीताच्या प्रकाशनाची तारीख जवळ आली तशी धामधूम वाढलीये. एखाद्या व्हिडियो गेममधे जसं शेवटच्या टप्प्यावर असतांना चारही बाजूंनी आव्हानांचा मारा सुरू होतो, तशी आत्ताची परीस्थिती झालीये! दिवसरात्र एक करून कामं करावी लागतायत, शरीर-मन एकमेकांना थकण्याची परवानगी देत नाही!  मित्र, सहकारी एकत्र आलेत आणि कामाला वेग आलेला आहे. बहुतेक वेळा […]
January 7, 2010

लागले मन परतीच्या वाटेवरती

लागले मन परतीच्या वाटेवरती… ‘जान्हवी’ या अल्बमची सगळी गाणी अष्टनायिका या विषयावर आधारलेली आहेत. ‘मन परतीच्या वाटेवरती’ हे कलहान्तारिका या नायिकेचं गीत आहे. प्रियकराशी भांडल्यावर पश्चात्ताप झालेली ही नायिका आता व्याकुळ आहे. गुरू ठाकुरने शब्द लिहून दिले आणि त्यावर मी चाल बांधली. चाल झाल्यावर वाटलं की मन परतीच्या वाटेवर आहे […]
December 19, 2009

कसे जाता लगी!

kase jaata lagi full song गीत – अशोक बागवेसंगीत – कौशल श्री. इनामदारगायिका – जान्हवी प्रभू-अरोरा
November 24, 2008

शंकरराव बिनीवाले: एका सिंदबादची कहाणी

काही वर्षांपूर्वी मी माणिक वर्मांच्या घरी गेलो होतो. शांताबाई शेळकेंच्या कवितांना स्वरबद्ध करून ‘शुभ्र कळ्या मूठभर’ नावाचा एक अल्बम मी केला होता आणि माझी अशी तीव्र इच्छा होती की त्याचं प्रकाशन माणिक वर्मांच्या हस्ते व्हावं. माणिकबाईंनी अतिशय आस्थेने त्या अल्बम मधली सर्व गाणी ऐकली आणि अतिशय प्रेमाने येण्याचं कबूल केलं. […]
October 21, 2008

मनात माझ्या

पुन्हा दिवाळी उंबरठ्यावर आहे. दिवाळी जवळ आली की मन नॉस्टॅल्जिक होतं. जुन्या आठवणी येरझारा घालु लागतात. मला दिवाळी आठवते ती गोव्यात घालवलेली. गोव्यातली नर्कचतुर्दशी पाहण्यासारखी असते. पणजीच्या चौकात गोव्यातल्या विविध गावांमधुन तयार करून आणलेले नर्कासुरांचे पुतळे मिरवले जातात. लहान असताना ही पणजीतली दिवाळी मी अनुभवली आहे. आमच्याच हॉटेलमध्ये राहणाऱ्या एका […]
October 26, 2007

हक़ीक़त ने ऐसा पक़डा गिरेबाँ

इट्स ब्रेकिंग न्यूज़ मधलं हे तिसरं गाणं मी माझ्या ब्लॉग वर अपलोड करत आहे. सोबत त्या गाण्यामागची कथा ही सांगितली आहे. आपण गाणं ऐकून आपला प्रतिसाद दिलात तर खूप आनंद होईल. https://kaushalsinamdar.in//2007/10/haqeeqat-ne-aisa-pakda-girebaan-child/ गीत इथे डाऊनलोड करता येईल.http://ourmedia.org/allmedia&uid=69864