लागले मन परतीच्या वाटेवरती

लागले मन परतीच्या वाटेवरती…

‘जान्हवी’ या अल्बमची सगळी गाणी अष्टनायिका या विषयावर आधारलेली आहेत. ‘मन परतीच्या वाटेवरती’ हे कलहान्तारिका या नायिकेचं गीत आहे. प्रियकराशी भांडल्यावर पश्चात्ताप झालेली ही नायिका आता व्याकुळ आहे. गुरू ठाकुरने शब्द लिहून दिले आणि त्यावर मी चाल बांधली. चाल झाल्यावर वाटलं की मन परतीच्या वाटेवर आहे हा एक सूफी अध्यात्मिक विचारच आहे. त्यावरून या गीताची सुरुवात एका सूफ़ी गायन वाटेल अशा ओळीने करायचं ठरवलं. गुणगुणता गुणगुणता एक हिंदीत ओळ सुचली ज्याचं यमक मन परतीच्या वाटेवरतीशी जुळले –

कब रूठा लहरों से किनारा, कब रूठी सावन से धरती ?
लागले मन परतीच्या वाटेवरती !

4 Comments

  1. अनघा says:

    खूप दिवसांनी इतकं सुंदर गाणं ऐकलं. संगीत अप्रतिम आहे. अभिनंदन!

  2. Meena says:

    Mala khupach sundar watle gane. Hee parteechi wat jivanachya sandhyakali parat tya nirmatyakade nenari watli…

  3. चांगलं जमलं आहे गाणे …. मन परतीच्या वाटेवरती हा भाग ऐकताना एकदम 'कुछ कहता है ये सावन' ची आठवण झाली …
    लाईव्ह गाताना तिचा स्वत:चाच "Overlap" कसा काय सांभाळला?

What do you think?