पेणचे मूर्तिकार देवधर आपल्या गणपतीच्या मूर्तींसाठी प्रसिध्द होते. त्यांचा कारखाना पाहतांना मी पहिल्यांदा साच्यातले गणपती पाहिले होते. मग ते पूर्ण रंगवून झाले की असं वाटायचं की मूर्तिकार मातीला चैतन्य प्राप्त करून देतोय! देवाने घडवलेला माणूस पुन्हा देव घडवतोय! त्यांच्या चिरंजीवांनी, आनंद देवधरांनी, मला त्यांच्या कारखान्यातली एक मूर्ती भेटही दिली आहे. […]