महाभारताचं युद्ध संपलंय आणि हस्तिनापूरवर पांडवांचं राज्य आहे. धृतराष्ट्र आणि गांधारी पुत्रशोकात आहेत. इथे आपलं आता काहीच उरलं नाही या भावनेने ते वानप्रस्थान करण्याचा निर्णय घेतात. आपल्या सर्व कर्तव्यांतून मोकळी झालेली कुंती आणि काही पाश मागे न उरलेला विदुरही त्यांच्याबरोबर अरण्यात जायचं ठरवतात. खरं तर इथे महाभारताची गोष्ट संपलेली आहे. […]