२ ऑगस्ट २००८ची संध्याकाळ विसरणं अशक्य आहे. त्या दिवशी चेतन गेला. पण त्याहून अधिक अशक्य आहे ते त्या दिवशीची संध्याकाळ ‘आठवणं’. चेतनचा मृतदेह जमीनीवर ठेवलेला आठवला की त्या वेळी मनात आलेला विचार पुन्हा मनात येतो. मी ज्याला चेतन म्हणून ओळखत होतो, तो हा नव्हता. मग मी इथे कुणासाठी आलो होतो? […]