poetry

July 17, 2020

पाऊस हा फुलांचा – छंद ओठांतले – भाग ९

बाहेर अविरत पाऊस पडतोय. अविरत. Continuously. शाळेत असताना व्याकरणात आपण Present Continuous Tense – अपूर्ण वर्तमानकाळ – शिकलो आहोत. हा अपूर्ण वर्तमानकाळ आपल्याला वाक्यातही आणता येतो आणि काव्यातही! परंतु हा अविरतपणा, अपूर्ण वर्तमानकाळ संगीत रचनेत कसा आणता येईल याचा मी अनेकदा विचार करत असे. काही वर्षांपूर्वी प्रा. अशोक बागवेंनी मला […]
July 14, 2020
Man Chimb Pavasali

मन चिंब पावसाळी – छंद ओठांतले – भाग ८

२०११ सालच्या जुलै महिन्यातले दिवस होते. मी नागपूरला एका कार्यक्रमानिमित्त गेलो होतो. दुसऱ्या दिवशीच मुंबईला परत येण्याचा बेत होता. कार्यक्रम झाल्यावर फोन तपासला तर नितीन देसाईंचे अनेक मिस्ड कॉल्स दिसले. मी फोन लावला. नितीन देसाईंनी विचारलं – “कुठे आहेस?” मी म्हटलं – “नागपूरला आलोय कार्यक्रमासाठी. उद्या येतोय परत मुंबईला.” “तू […]
July 16, 2015

एक साहित्यिक वारी

वारीचे दिवस पुन्हा सुरू झाले आहेत. काही वर्षांपूर्वी पंढरपूरच्या वारीची माहिती देणाऱ्‍या एका संकेतस्थळाचं माझ्या हस्ते पुण्याच्या एस्.एम्. जोशी सभागृहात उद्घाटन झालं. एका अध्यात्मिक विषयावर, आधुनिक तंत्रज्ञानाच्या साह्याने केलेल्या संकेतस्थळाचं, एका समाजवादी नेत्याच्या नावावर असलेल्या सभागृहात उद्घाटन होतं – हे फक्त भारतातच होऊ शकतं! पण जे परमेश्वराला मानत नाहीत ते त्याच्या (तिच्या) संतांना मात्र मनापासून मानतात […]
June 26, 2015

बालगंधर्व साकारताना…

  ‘बालगंधर्व’चं संगीत करताना ज्या अनेक आव्हानांना सामोरं जावं लागलं त्यातलं प्रमुख आव्हान होतं की शंभर-सव्वाशे वर्षांपूर्वीचं संगीत पुनर्निर्मित करताना ते अस्सल तर वाटायला हवंच होतं पण त्याच बरोबर जुनाट वाटता कामा नये याची खबरदारी घ्यायची होती. ज्यांनी बालगंधर्वांचं संगीत ऐकलं आहे, त्यांना पाहिलं आहे त्यांच्या मनातल्या बालगंधर्वांच्या प्रतिमेला तडाही जाता कामा नये पण […]
August 16, 2014

या शुभ्र विरल अभ्रांचे…

मराठी चित्रपट आणि भावगीतांमध्ये प्रेमाच्या वेगवेगळ्या विभ्रमांना जे स्थान आहे, कदाचित तेच स्थान निसर्गाला आहे. अनेक निसर्गगीतं आपल्या परिचयाची आहेत. बर्‍याच निसर्गगीतांमध्ये निसर्ग हा मानवी भावनांसाठी रूपक म्हणून वापरल्याचं आपल्याला आढळतं. निसर्गाच्या रूपकांमधून मानवी संबंधांचा व्यवहार काव्यात्म पद्धतीने मांडलेला दिसतो. उदाहरणार्थ – फिटे अंधाराचे जाळे झाले मोकळे आकाश दरीखोर्‍यातून वाहे […]