क्षितिज जसे दिसते

June 26, 2015

बालगंधर्व साकारताना…

  ‘बालगंधर्व’चं संगीत करताना ज्या अनेक आव्हानांना सामोरं जावं लागलं त्यातलं प्रमुख आव्हान होतं की शंभर-सव्वाशे वर्षांपूर्वीचं संगीत पुनर्निर्मित करताना ते अस्सल तर वाटायला हवंच होतं पण त्याच बरोबर जुनाट वाटता कामा नये याची खबरदारी घ्यायची होती. ज्यांनी बालगंधर्वांचं संगीत ऐकलं आहे, त्यांना पाहिलं आहे त्यांच्या मनातल्या बालगंधर्वांच्या प्रतिमेला तडाही जाता कामा नये पण […]
April 23, 2015
पुस्तक - आम्हा घरी धन शब्दांचीच रत्ने

आम्हा घरी धन शब्दांचीच रत्ने

कुणीतरी म्हटलंय की पुस्तकं म्हणजे नुसते कागद एकत्र बाइंड केले नसतात, तर साक्षात माणसांची जिवंत मनं आपल्यासमोर ठेवली असतात. आणि माझ्या वडिलांनी अनेक जिवंत मनं आपल्या संग्रहात जोडली. “आम्हा घरी धन शब्दांचीच रत्ने…” हे आमच्या घराबाबतीत शंभर टक्के खरं होतं. आज मला वाचनाची आवड लागण्यात माझ्या वडिलांच्या पुस्तकं जमवण्याच्या छंदाचंच श्रेय आहे. कारण ज्या […]
February 13, 2015

संगीतक्षेत्रातील मराठी – स्थितीगती आणि दिशा

प्रस्तावना काही वर्षांपूर्वीची गोष्ट. उत्तर हिंदुस्थानी अभिजात संगीत गाणाऱ्या एका विदुषीने केलेल्या एका विधानावर काही मित्रांमध्ये घनघोर चर्चा रंगली होती. ‘संगीताला भाषा नसते’ असं ते विधान होतं. हे विधान वरवर वाटतं तितकं काही सोपं नाही. साधं तर अजिबात नाही. संगीताचा आणि भाषेच्या संबंधांच्या निबिड अरण्यात शिरलात की तुम्ही वाट चुकलातच […]
September 11, 2014

नागपूर पुस्तकं आणि फोटोकॉपी

सारेगमप लिट्ल चॅम्प्सची निवड करण्यासाठी आणि मराठी अभिमानगीताच्या एका कार्यक्रमाच्या निमित्ताने नागपूरला जायची संधी मिळाली. उन्हाळ्यात नागपूरला जाणं याला ‘संधी’ म्हणण्यावर बर्‍याच वाचकांचा आक्षेप असू शकतो! पण नागपूरचा या खेपेचा दौरा इतका श्रीमंत आणि समृद्ध करणारा ठरला की उन्हाची ‘झळ’ लागली तरी अनिलांची ‘केळीचे सुकले बाग’च आठवायची. बर्‍याच अर्थाने नागपूरचा हा दौरा पुस्तकमय होता. […]
August 30, 2014
होऊनिया पार्वती मळिते मी गणपती

होऊनिया पार्वती मळिते मी गणपती…

महाराष्ट्रात संगीतकार म्हणून मान्यता मिळवायला जे तीन प्रकार ‘मॅन्डेटरी’ समजले जातात ते म्हणजे – भावगीत, लावणी, आणि गणपतीचं गाणं! संगीतकार म्हणून १९ वर्षाच्या माझ्या कारकीर्दीत मी या तीन प्रकारातला भावगीत सोडला तर इतर दोन प्रकार हाताळले नव्हते. नाही म्हणायला ‘बालगंधर्व‘ या चित्रपटात ‘नेसली पितांबर जरी’ या पारंपारिक लावणीचा पुनर्निर्माण करण्याचा […]
August 16, 2014

या शुभ्र विरल अभ्रांचे…

मराठी चित्रपट आणि भावगीतांमध्ये प्रेमाच्या वेगवेगळ्या विभ्रमांना जे स्थान आहे, कदाचित तेच स्थान निसर्गाला आहे. अनेक निसर्गगीतं आपल्या परिचयाची आहेत. बर्‍याच निसर्गगीतांमध्ये निसर्ग हा मानवी भावनांसाठी रूपक म्हणून वापरल्याचं आपल्याला आढळतं. निसर्गाच्या रूपकांमधून मानवी संबंधांचा व्यवहार काव्यात्म पद्धतीने मांडलेला दिसतो. उदाहरणार्थ – फिटे अंधाराचे जाळे झाले मोकळे आकाश दरीखोर्‍यातून वाहे […]
August 9, 2014

सूर आणि संस्कृती

कुठूनसे भटियारचे सूर कानावर आले आणि मला जाग आली. पडदे लावलेलेच होते, पण भटियारमुळे सकाळचं वातावरण तयार झालं होतं. मग पडदे उघडले आणि सूर्याची कोवळी किरणं खोलीत सांडली. आपल्या रागसंगीतामध्ये प्रहराप्रमाणे राग गायले जातात याचं मला अगदी पहिल्यापासून कुतूहल आहे. भैरव, ललत, सकाळीच का? मारवा, पूर्वी संध्याकाळीच का? असे अनेक […]
August 2, 2014

मातीवर चढणे एक नवा थर अंती…

२ ऑगस्ट २००८ची संध्याकाळ विसरणं अशक्य आहे. त्या दिवशी चेतन गेला. पण त्याहून अधिक अशक्य आहे ते त्या दिवशीची संध्याकाळ ‘आठवणं’. चेतनचा मृतदेह जमीनीवर ठेवलेला आठवला की त्या वेळी मनात आलेला विचार पुन्हा मनात येतो. मी ज्याला चेतन म्हणून ओळखत होतो, तो हा नव्हता. मग मी इथे कुणासाठी आलो होतो? […]
September 11, 2013

गणपतीचे कान

काल रस्त्याने जात असतांना एका सार्वजनिक गणेशोत्सव मंडळासमोर गणरायाची फारच देखणी मूर्ति आढळली. त्या मूर्तिचं दर्शन घेण्याकरिता मी क्षणभर तिथे थांबलो. एक स्त्री आपल्या ४-५ वर्षाच्या मुलाला घेऊन तिथे आली आणि माय-लेक माझ्या शेजारीच उभे राहून ती मूर्ति न्याहाळू लागले. आई मुलाला सांगत होती – “बघ! किती छान आहे बाप्पाची […]
March 15, 2013

मराठी अभिमानगीतामध्ये शेवटच्या चार ओळी का नाही घेतल्या ?

यंदाच्या २७ फेब्रुवारीला – मराठी भाषा दिनी मराठी अभिमानगीताच्या प्रकाशनाला ३ वर्ष पूर्ण झाली आणि पुन्हा एकदा यूट्यूबवर असलेल्या मराठी अभिमानगीताकडे लोकांचा ओघ वाढला. मराठी लोकांचा या गीताला भरभरून प्रतिसाद मिळाला. कौतुकाचा वर्षाव जसा या गीतावर झाला तसेच काही प्रश्नही उपस्थित केले गेले. त्यातला वारंवार विचारला जाणारा प्रश्न म्हणजे मराठी […]