मराठी

July 23, 2017
Chaplin in Limelight

वरदानाचा शाप

संगीतक्षेत्रात मी पाऊल ठेवलं तेव्हां वेगवेगळ्या निमित्ताने अनेक दिग्गज कलाकारांच्या भेटीचा योग आला. हे सगळेच कलावंत थोर होते पण क्वचितच एखादा कलावंत मला समाधानी दिसला. बहुतेकजण अतृप्त, बेचैन… सुरुवातीला मला या दृश्याची भीति वाटायची. इतकी वर्ष काम करून… उत्तम काम करून हाताला इतकंच लागतं का? बेचैनी? असमाधान?अतृप्तता? वैफल्य? तरी हे […]
March 28, 2017
gudhi padwa

नवे गीत गाऊ

चैत्राची चाहूल लागली आणि मन आपोआप नवीन होऊन गेलं. मला अचानक आठवलं ते सुधीर फडकेंचं गीत – नवीन आज चंद्रमा, नवीन चैत्र यामिनी… या गाण्यातही चैत्राचा उल्लेख आहे आणि त्यामुळे रोजचा चंद्रमाही का नवीन वाटत असेल हे कोडं उलगडतं. मला प्रत्येक नवीन वर्षाची ही गंमत वाटते. खरं तर काय असं […]
July 16, 2015

एक साहित्यिक वारी

वारीचे दिवस पुन्हा सुरू झाले आहेत. काही वर्षांपूर्वी पंढरपूरच्या वारीची माहिती देणाऱ्‍या एका संकेतस्थळाचं माझ्या हस्ते पुण्याच्या एस्.एम्. जोशी सभागृहात उद्घाटन झालं. एका अध्यात्मिक विषयावर, आधुनिक तंत्रज्ञानाच्या साह्याने केलेल्या संकेतस्थळाचं, एका समाजवादी नेत्याच्या नावावर असलेल्या सभागृहात उद्घाटन होतं – हे फक्त भारतातच होऊ शकतं! पण जे परमेश्वराला मानत नाहीत ते त्याच्या (तिच्या) संतांना मात्र मनापासून मानतात […]
April 23, 2015
पुस्तक - आम्हा घरी धन शब्दांचीच रत्ने

आम्हा घरी धन शब्दांचीच रत्ने

कुणीतरी म्हटलंय की पुस्तकं म्हणजे नुसते कागद एकत्र बाइंड केले नसतात, तर साक्षात माणसांची जिवंत मनं आपल्यासमोर ठेवली असतात. आणि माझ्या वडिलांनी अनेक जिवंत मनं आपल्या संग्रहात जोडली. “आम्हा घरी धन शब्दांचीच रत्ने…” हे आमच्या घराबाबतीत शंभर टक्के खरं होतं. आज मला वाचनाची आवड लागण्यात माझ्या वडिलांच्या पुस्तकं जमवण्याच्या छंदाचंच श्रेय आहे. कारण ज्या […]
August 16, 2014

या शुभ्र विरल अभ्रांचे…

मराठी चित्रपट आणि भावगीतांमध्ये प्रेमाच्या वेगवेगळ्या विभ्रमांना जे स्थान आहे, कदाचित तेच स्थान निसर्गाला आहे. अनेक निसर्गगीतं आपल्या परिचयाची आहेत. बर्‍याच निसर्गगीतांमध्ये निसर्ग हा मानवी भावनांसाठी रूपक म्हणून वापरल्याचं आपल्याला आढळतं. निसर्गाच्या रूपकांमधून मानवी संबंधांचा व्यवहार काव्यात्म पद्धतीने मांडलेला दिसतो. उदाहरणार्थ – फिटे अंधाराचे जाळे झाले मोकळे आकाश दरीखोर्‍यातून वाहे […]
August 2, 2014

मातीवर चढणे एक नवा थर अंती…

२ ऑगस्ट २००८ची संध्याकाळ विसरणं अशक्य आहे. त्या दिवशी चेतन गेला. पण त्याहून अधिक अशक्य आहे ते त्या दिवशीची संध्याकाळ ‘आठवणं’. चेतनचा मृतदेह जमीनीवर ठेवलेला आठवला की त्या वेळी मनात आलेला विचार पुन्हा मनात येतो. मी ज्याला चेतन म्हणून ओळखत होतो, तो हा नव्हता. मग मी इथे कुणासाठी आलो होतो? […]
March 15, 2013

मराठी अभिमानगीतामध्ये शेवटच्या चार ओळी का नाही घेतल्या ?

यंदाच्या २७ फेब्रुवारीला – मराठी भाषा दिनी मराठी अभिमानगीताच्या प्रकाशनाला ३ वर्ष पूर्ण झाली आणि पुन्हा एकदा यूट्यूबवर असलेल्या मराठी अभिमानगीताकडे लोकांचा ओघ वाढला. मराठी लोकांचा या गीताला भरभरून प्रतिसाद मिळाला. कौतुकाचा वर्षाव जसा या गीतावर झाला तसेच काही प्रश्नही उपस्थित केले गेले. त्यातला वारंवार विचारला जाणारा प्रश्न म्हणजे मराठी […]