मराठी

July 25, 2024

आवर्तन – दोन द्वादशींची कहाणी

२३ सप्टेंबर २००३. माझ्या मुलाचा जन्म झाला तो दिवस भाद्रपदातल्या द्वादशीचा होता. अनुरागचा जन्म जरा लवकर झाल्यामुळे त्याला ताबडतोब वांद्र्याच्या गुरूनानक इस्पितळाच्या NICU मध्ये हलवणं गरजेचं होतं. मला डॉक्टरांनी ऑपरेशन थिएटरमध्ये बोलावलं तेव्हा अनुराग रडायचं थांबला होता. डॉक्टरांनी त्याला माझ्या हातात दिलं तेव्हा कंठ दाटून आला. भावनांचा इतका कल्लोळ होता […]
May 12, 2023

ढवळल्या आभाळाची नको मागू काही खूण

“चारच ओळी आहेत पण गाणं पूर्ण वाटायला हवं.“ हा एकच विचार माझ्या मनात रेंगाळत होता. कारण आता गाणं रुक्मिणीचं नसून कृष्णाचं होतं. समीरच्या त्या सिटिंग-रूममध्ये बसून तात्त्विक विचार करायला अजिबात वेळ नव्हता. पण कुठलंही सृजन हे मूलतः बौद्धिक (intellectual) नसतं असं माझं अनेक वर्षांनंतर मत झालंय. याचा अर्थ असा नाही […]
April 25, 2023

ओसरला दिनमणी

सगळी वाद्य आणि यंत्र लावून होईपर्यंत तोवर संध्याकाळचे ५ वाजले होते आणि उन्हं उतरायला सुरुवात झाली होती. तापस सरांनी लिहिलेली पहिली कविता पाहिली. शब्द होते – ओसरला दिनमणीफुंकरली तेजवातघणघणला घंटानाददेवळात मंदिरातकृष्णगृही शांततेतअवतरली क्लांत पदे,“बोल सख्या, बोल बोल!”कशी पाहू तुजकडे! – विजय तापस (संगीत अखेरचा रास) दिवस ओसरत चालला तरी श्रीकृष्ण […]
April 23, 2023

अखेरचा रास – प्रस्तावना

जुलैचे दिवस आले की मुंबईच्या महाविद्यालयीन नाटकवेड्या विद्यार्थ्यांना आयएन्टीच्या आंतरमहाविद्यालयीन नाट्यस्पर्धेचे वेध लागतात. या स्पर्धेचा एक नियम असा, की संहिता नवीन लागते. एखाद्या कादंबरीचं अथवा कथेचं रूपांतर चालतं परंतु आधी सादर केलेली एकांकिका या स्पर्धेत चालत नाही. साधारण २००३-२००४चा काळ असेल. प्रा. विजय तापस सरांचा मला फोन आला की रुइया […]
March 20, 2023

शाश्वताची शोधयात्रा

असं काय आहे कवितेत की माणसाला कवितेतून व्यक्त व्हावंसं वाटतं? या गोष्टीचं मला कायम कुतुहल वाटत आलं आहे. एखादा निबंध, एखादी कथा किंवा कादंबरी अधिक स्पष्टपणे अभिव्यक्ती करण्यासाठी उचित आकृतिबंध नाही का? याचं उत्तर असं असावं असं मला वाटतं – केवळ व्यक्त होणं ही माणसाची ऊर्मी नसते, तर आपण म्हटलेलं […]
December 22, 2021
tabla

शास्त्रीय संगीत आणि तरूण पिढी

मध्यंतरी ‘स्नॉव्हेल’ या बोलक्या पुस्तकांच्या ॲपवर झालेल्या परिसंवादात सहभागी झालो होतो. त्यात विचारलेल्या प्रश्नांना मी जी उत्तरं दिली त्याचं हे संकलन. या परिसंवादात माझ्यासोबत डॉ. आशुतोष जावडेकर आणि विदुषी शुभदा पराडकर सहभागी झाले होते. संपूर्ण परिसंवाद तुम्हाला ‘स्नॉव्हेल’वर ऐकता येईल. १) तरूण पिढीने शास्त्रीय संगीत शिकणं गरजेचं आहे असं तुम्हाला […]
December 19, 2021

‘चैत्रबन’ पुरस्कराच्या निमित्ताने

कोव्हिडने काळाच्या मधोमध पाचर मारली आणि काळाचे दोन तुकडे केले. कोव्हिडपूर्व काळ आणि कोव्हिडोत्तर काळ. एका अर्थाने या महामारीने आख्ख्या जगालाच फॅक्टरी रिसेट मारला. जग बदललं.  एक अदृश्य, निर्गुण, निराकार विषाणू – पण इतकं आक्राळविक्राळ रूप धारण करेल याची कुणाला कल्पना होती? हा काळ सगळ्यांनाच जसा कठीण होता तसा तो […]
November 8, 2021

पुलंच्या दोन भेटी

दर वर्षी या दिवशी मला पुलंची ही भेट आठवते. चांगलं दोन अडीच तास पुलंच्या सहवासात घालवलेला हा वेळ मला आयुष्यभर पुरेल!‘कवितेला चाली देऊन त्यांचा कार्यक्रम का करावासा वाटला?’ या त्यांच्या प्रश्नाला माझ्यातल्या नवख्या, अतिउत्साही आणि त्यांच्या कौतुकाने हुरळून गेलेल्या संगीतकाराने – “मला काहीतरी वेगळं करायचं होतं” असं त्या वेळी भारी […]
August 15, 2020
kuni nahi ga kuni nahi

तारकांचे गाणे – छंद ओठांतले – भाग १६

आकाशात तारे सगळ्यांनाच दिसतात. सगळ्यांमधल्या अनेकांना ताऱ्यांनी भरलेल्या आकाशाचा आनंद घेता येतो. त्या अनेकांमधल्या काहींना त्या ताऱ्यांचं वर्णन करता येतं. त्या काहींपैकी मोजक्यांनाच आकाशात या तारका कशा दिसतात यावर कविता लिहिता येते. पण तारकांना आपण कसे दिसतो हे सांगायला मात्र बालकवीच लागतात! भूतलावर माणसं निद्रेच्या कुशीत शिरली की आकाशातल्या सगळ्या […]
July 21, 2020

रानात झिम्म पाऊस – छंद ओठांतले – भाग १०

१९९३-९४ची गोष्ट असावी. मी नुकता चाली द्यायला लागलो होतो. काही मित्र आणि घरातली मंडळी सोडून फार कुणी त्या ऐकलेल्याही नव्हत्या. मी संगीतरचना करातोय याचं, माझा मित्र आणि गुरू चेतन दातार, याला मात्र प्रचंड कौतुक होतं. चेतनला जे ओळखतात, त्यांना त्याच्या कौतुकाची किंमत लगेचच कळेल! अर्थात चेतनची कौतुक करण्याची पद्धत जरा […]