क्षितिज जसे दिसते

June 24, 2020
Aata Ujadel - Mangesh Padgaonkar

‘आता उजाडेल’ – छंद ओठातले – भाग १

रसिक नेहमी गाणं पूर्णत्वाला गेलं की मगच ऐकतात. पण संगीतकाराकडून फक्त पेटीवर चाल ऐकणं ही एक वेगळीच अनुभूती असते. तयार, ध्वनिमुद्रित गाणं गायकाकडून ऐकणं म्हणजे ट्रिव्हागोवर जाऊन जागेची माहिती घेण्यासारखं आहे आणि संगीतकाराकडून थेट चाल ऐकणं म्हणजे लोकल गाइड घेऊन तीच जागा पाहण्यासारखं आहे. गायक तुम्हाला एक पॉलिश्ड अनुभव नक्कीच […]
February 3, 2020

अशी दुपार

भक्ताला संकटकाली जसा परमेश्वर आठवतो तसं कधी खूप घाईत एखाद्या गाण्याची गरज पडली तर मी बागवे सरांकडे धाव घेतो. ते उत्तम शीघ्रकवी तर आहेतच पण शब्दप्रभूही आहेत. अरूण म्हात्रे, अशोक बागवे, अशोक नायगांवकर, नलेश पाटील, महेश केळुसकर आणि निरंजन उजगरे हे सगळे कवी मिळून ‘कवितांच्या गावा जावे’ असा एक कार्यक्रम […]
September 2, 2019

श्रावणात घन निळा…

         आपल्या पंचांगातल्या बारा महिन्यांपैकी सर्वात लक्षवेधी म्हणावा असा कुठला महिना असेल तर तो श्रावण महिना! सण, उपासतापास, गाणी, या सगळ्यांचा महिना म्हणजे श्रावण! ऊन पाऊसाचे अनेकविध विभ्रम दाखवणाऱ्या या खेळकर, मनस्वी महिन्यालाही ‘श्रावणबाळ’ का म्हणू नये असा विचार माझ्या मनात डोकावल्याशिवाय राहत नाही!          गाणी आणि कवितांची तर या महिन्यात रेलचेल असते! हिंदी […]
August 4, 2019

श्रवणसंस्कृती

श्रोत्यापासून रसिक होण्याचा प्रवास हा कारागीरापासून कलाकार होण्याच्या प्रवासाइतकाच खडतर असतो. रसिकत्व कुणी बहाल करू शकत नाही, ते कमवावं लागतं.
April 20, 2018

काळोखाचे वरदान

साग़र सिद्दिक़ी यांची एक गाजलेली ग़ज़ल आहे – ‘चराग़े तूर[1] जलाओ, बड़ा अंधेरा है। ज़रा नक़ाब उठाओ, बड़ा अंधेरा है॥   वो जिनके होते हैं ख़ुर्शीद[2] आस्तीनों[3] में उन्हें कहीं से बुलाओ बड़ा अंधेरा है॥’   याच आशयाच्या हिमांशु कुलकर्णी यांच्याही ओळी आपण ऐकलेल्या आहेत – ‘थोडा उजेड ठेवा, अंधार […]
July 23, 2017
Chaplin in Limelight

वरदानाचा शाप

संगीतक्षेत्रात मी पाऊल ठेवलं तेव्हां वेगवेगळ्या निमित्ताने अनेक दिग्गज कलाकारांच्या भेटीचा योग आला. हे सगळेच कलावंत थोर होते पण क्वचितच एखादा कलावंत मला समाधानी दिसला. बहुतेकजण अतृप्त, बेचैन… सुरुवातीला मला या दृश्याची भीति वाटायची. इतकी वर्ष काम करून… उत्तम काम करून हाताला इतकंच लागतं का? बेचैनी? असमाधान?अतृप्तता? वैफल्य? तरी हे […]
July 1, 2017
कुसुमानिल प्रकाशन सोहळा

कुसुमानिल – प्रकाशकाचे मनोगत

नमस्कार! उद्या दिनांक २ जुलैला मराठी अस्मिता सांस्कृतिक प्रतिष्ठान या आमच्या ना-नफा संस्थेतर्फ ‘कुसुमानिल’ या पुस्तकाचं प्रकाशन नागपूरला सुप्रसिद्ध नाटककार श्री महेश एलकुंचवार यांच्या हस्ते होणार आहे. व्यक्तिशः माझ्यासाठी ही अत्यंत महत्त्वाची घटना आहे. मराठी भाषेचा एक अत्यंत महत्त्वाचा दस्तैवज हा ‘मराठी अस्मिता’तर्फे पुन:प्रकाशित केला जातोय ही आनंदाची आणि अभिमानाची […]
March 28, 2017
gudhi padwa

नवे गीत गाऊ

चैत्राची चाहूल लागली आणि मन आपोआप नवीन होऊन गेलं. मला अचानक आठवलं ते सुधीर फडकेंचं गीत – नवीन आज चंद्रमा, नवीन चैत्र यामिनी… या गाण्यातही चैत्राचा उल्लेख आहे आणि त्यामुळे रोजचा चंद्रमाही का नवीन वाटत असेल हे कोडं उलगडतं. मला प्रत्येक नवीन वर्षाची ही गंमत वाटते. खरं तर काय असं […]
September 28, 2015
गायक आणि पेय

गायक आणि पेय

एक विचार मनात आला. कुणाला वायफळही वाटू शकतो. गायक आणि पेयांमध्ये साधर्म्य शोधयचा प्रयत्न केला तर कुठला गायक कुठलं पेय असेल? तर मुकेश हे लिंबू सरबत आहेत. जरा आंबटसर चव आहे त्यांच्या अनुनासिक आवाजाची. मन्ना डे हे दूध आहेत. पौष्टिक आणि शक्तिवर्धक. गीता दत्त कडक फिल्टर कॉफी आहेत. झोप उडवतात. […]
July 16, 2015

एक साहित्यिक वारी

वारीचे दिवस पुन्हा सुरू झाले आहेत. काही वर्षांपूर्वी पंढरपूरच्या वारीची माहिती देणाऱ्‍या एका संकेतस्थळाचं माझ्या हस्ते पुण्याच्या एस्.एम्. जोशी सभागृहात उद्घाटन झालं. एका अध्यात्मिक विषयावर, आधुनिक तंत्रज्ञानाच्या साह्याने केलेल्या संकेतस्थळाचं, एका समाजवादी नेत्याच्या नावावर असलेल्या सभागृहात उद्घाटन होतं – हे फक्त भारतातच होऊ शकतं! पण जे परमेश्वराला मानत नाहीत ते त्याच्या (तिच्या) संतांना मात्र मनापासून मानतात […]