fbpx

क्षितिज जसे दिसते

July 28, 2020

झोका मंद झुले – छंद ओठांतले – भाग १२

‘छंद ओठांतले’ या मालिकेच्या मागच्या भागात मी शांता शेळके यांनी लिहिलेल्या ‘रिमझिम बरसत श्रावण आला’ या गाण्याबद्दल लिहिलं होतं. रिमझिम बरसत श्रावण आलासाजण नाही आला असं शांताबाईंनी लिहिलं होतं. शांताबाईंच्या कवितेतला न आलेला साजण हा अनेक वर्षांनंतर त्यांच्या विद्यार्थ्याच्या – म्हणजे अशोक बागवे यांच्या कवितेत आला! एका अर्थाने गुरूच्या प्रश्नाला […]
July 25, 2020

सुधीर फडके – सुरांतून चित्र तयार करणारा जादुगार

साल २००१. स्थळ वांद्र्याच्या एका रेस्टराँचा मॅझनाइन मजला. दोन टेबल. एका टेबलावर एक पंजाबी कुटुंब – दोन मुलं, आई, वडील आणि आजी-आजोबा. शेजारच्या टेबलावर विविध वयातले साधारण दहा-बारा लोक.  या पंजाबी कुटुंबाला आपल्या शेजारच्या टेबलावर एक ऐतिहासिक बैठक सुरू आहे याची सुतराम कल्पना नाही. मला मात्र हा इतिहास उलगडतांना दिसत […]
July 25, 2020

रिमझिम बरसत श्रावण आला… छंद ओठांतले – भाग ११

शांताबई शेळकेंच्या गीतलेखनात एक सिनेमॅटिक क्वॉलिटी आहे. एका गीतातून आपल्या डोळ्यांसमोर ते पात्र, तो प्रसंग, ते वातावरण सगळं उभं राहतं. त्यांच्या चित्रपटबाह्य गीतांतूनही आपल्याला हा गुण दिसतो. मग ते ‘तोच चंद्रमा नभात’ असो किंवा ‘जिवलगा राहिले दूर घर माझे’ असो. नुसत्या चित्रमयतेच्या पलीकडचा हा गुण आहे. शांताबाईंनी लिहिलेली एक कविता […]
July 21, 2020

रानात झिम्म पाऊस – छंद ओठांतले – भाग १०

१९९३-९४ची गोष्ट असावी. मी नुकता चाली द्यायला लागलो होतो. काही मित्र आणि घरातली मंडळी सोडून फार कुणी त्या ऐकलेल्याही नव्हत्या. मी संगीतरचना करातोय याचं, माझा मित्र आणि गुरू चेतन दातार, याला मात्र प्रचंड कौतुक होतं. चेतनला जे ओळखतात, त्यांना त्याच्या कौतुकाची किंमत लगेचच कळेल! अर्थात चेतनची कौतुक करण्याची पद्धत जरा […]
July 17, 2020

पाऊस हा फुलांचा – छंद ओठांतले – भाग ९

बाहेर अविरत पाऊस पडतोय. अविरत. Continuously. शाळेत असताना व्याकरणात आपण Present Continuous Tense – अपूर्ण वर्तमानकाळ – शिकलो आहोत. हा अपूर्ण वर्तमानकाळ आपल्याला वाक्यातही आणता येतो आणि काव्यातही! परंतु हा अविरतपणा, अपूर्ण वर्तमानकाळ संगीत रचनेत कसा आणता येईल याचा मी अनेकदा विचार करत असे. काही वर्षांपूर्वी प्रा. अशोक बागवेंनी मला […]
July 14, 2020
Man Chimb Pavasali

मन चिंब पावसाळी – छंद ओठांतले – भाग ८

२०११ सालच्या जुलै महिन्यातले दिवस होते. मी नागपूरला एका कार्यक्रमानिमित्त गेलो होतो. दुसऱ्या दिवशीच मुंबईला परत येण्याचा बेत होता. कार्यक्रम झाल्यावर फोन तपासला तर नितीन देसाईंचे अनेक मिस्ड कॉल्स दिसले. मी फोन लावला. नितीन देसाईंनी विचारलं – “कुठे आहेस?” मी म्हटलं – “नागपूरला आलोय कार्यक्रमासाठी. उद्या येतोय परत मुंबईला.” “तू […]
July 9, 2020

‘रात्र भिजली’ – छंद ओठांतले – भाग ७

रात्र भिजली कापऱ्या तंद्रीत पाने निजली…  मंगेश पाडगांवकरांची ‘जिप्सी’ संग्रहातली कविता वाचली आणि वाचून पुढे गेलो. पुढे गेलो, पण याच्या पुढचा बंध सतत मनात विहरत राहिला.  काजवा उडे एकला झुरत मालवे… बुडे तीनच ओळी. दोनच शब्द. धृवपद – कडवं असा पॅटर्न नाही. खरं तर कुठल्याच अंगाने गेय अशी ही कविता […]
July 7, 2020

चार दिवस सासूचे – छंद ओठांतले – भाग ६

‘चार दिवस सासूचे’ मालिका नुकतीच प्रदर्शित व्हायला सुरुवात झाली होती. एका समारंभात मला मराठीतला एक सुप्रसिद्ध दिग्दर्शक भेटला. मला पाहिल्याबरोबर तो जरा छद्मी हसला आणि म्हणाला – “अरे काय गाणं केलंस तू हे? चार दिवस सासूचे?! अशी काय चाल केलीस?” त्याच्या प्रश्नातला कुत्सित सूर माझ्यापासून लपून राहिला नव्हता. पण मीही […]
July 2, 2020

‘कळ्यांचे दिवस फुलांच्या राती’ – छंद ओठांतले – भाग ५

संगीतकार म्हणून माझ्या कारकि‍र्दीच्या अगदी सुरुवातीला मंगेश पाडगांवकरांनी मला एक सल्ला दिला होता – “कवितांना तू चाली देतो आहेस हे ठीकच आहे, पण तू गाणं explore कर.” तेव्हा ते नेमकं काय सांगत आहेत ते मला नीटसं समजलं नव्हतं पण घरी आल्यावर शांताबाई शेळके यांचा गीतसंग्रह – ‘कळ्यांचे दिवस, फुलांच्या राती’ […]
June 30, 2020

नको देवराया अंत पाहू आता – छंद ओठांतले भाग ४

काही गाणी आपल्या सिस्टिमचा भाग असतात. ‘आनंदघन’ म्हणजे लता मंगेशकर यांनी ‘साधी माणसं’ या चित्रपटासाठी ‘नको देवराया अंत अता पाहू’ हा कान्होपात्रेचा अभंग मी आता कुठे आणि कधी ऐकला ते आता मला आठवतही नाही. पण व्याकुळ करणारे शब्द आणि काळजाला हात घालणारी चाल आणि पं. हृदयनाथ मंगेशकर यांचा कातर करणारा […]