kaushal inamdar

July 25, 2024

आवर्तन – दोन द्वादशींची कहाणी

२३ सप्टेंबर २००३. माझ्या मुलाचा जन्म झाला तो दिवस भाद्रपदातल्या द्वादशीचा होता. अनुरागचा जन्म जरा लवकर झाल्यामुळे त्याला ताबडतोब वांद्र्याच्या गुरूनानक इस्पितळाच्या NICU मध्ये हलवणं गरजेचं होतं. मला डॉक्टरांनी ऑपरेशन थिएटरमध्ये बोलावलं तेव्हा अनुराग रडायचं थांबला होता. डॉक्टरांनी त्याला माझ्या हातात दिलं तेव्हा कंठ दाटून आला. भावनांचा इतका कल्लोळ होता […]
June 7, 2023

प्रार्थना

मी आस्तिक आहे की नास्तिक, या निष्कर्षापर्यंतचा रस्ता सोपा नाही पण रंजक आहे. मी त्यावर चालतो, कधी भलत्याच पायवाटेने जातो, कधी विसावून एका जागी बसतो, कधी उलटा वळून चालू लागतो, कधी एका निष्कर्षापर्यंत पोहोचलोय म्हणून सुस्कारा टाकतो तर पुढे वळणावळणाचा घाटच सुरू झालाय असं आढळतं, तर अनेक वेळा या निष्कर्षापर्यंत […]
May 12, 2023

ढवळल्या आभाळाची नको मागू काही खूण

“चारच ओळी आहेत पण गाणं पूर्ण वाटायला हवं.“ हा एकच विचार माझ्या मनात रेंगाळत होता. कारण आता गाणं रुक्मिणीचं नसून कृष्णाचं होतं. समीरच्या त्या सिटिंग-रूममध्ये बसून तात्त्विक विचार करायला अजिबात वेळ नव्हता. पण कुठलंही सृजन हे मूलतः बौद्धिक (intellectual) नसतं असं माझं अनेक वर्षांनंतर मत झालंय. याचा अर्थ असा नाही […]
April 25, 2023

ओसरला दिनमणी

सगळी वाद्य आणि यंत्र लावून होईपर्यंत तोवर संध्याकाळचे ५ वाजले होते आणि उन्हं उतरायला सुरुवात झाली होती. तापस सरांनी लिहिलेली पहिली कविता पाहिली. शब्द होते – ओसरला दिनमणीफुंकरली तेजवातघणघणला घंटानाददेवळात मंदिरातकृष्णगृही शांततेतअवतरली क्लांत पदे,“बोल सख्या, बोल बोल!”कशी पाहू तुजकडे! – विजय तापस (संगीत अखेरचा रास) दिवस ओसरत चालला तरी श्रीकृष्ण […]
April 23, 2023

अखेरचा रास – प्रस्तावना

जुलैचे दिवस आले की मुंबईच्या महाविद्यालयीन नाटकवेड्या विद्यार्थ्यांना आयएन्टीच्या आंतरमहाविद्यालयीन नाट्यस्पर्धेचे वेध लागतात. या स्पर्धेचा एक नियम असा, की संहिता नवीन लागते. एखाद्या कादंबरीचं अथवा कथेचं रूपांतर चालतं परंतु आधी सादर केलेली एकांकिका या स्पर्धेत चालत नाही. साधारण २००३-२००४चा काळ असेल. प्रा. विजय तापस सरांचा मला फोन आला की रुइया […]
April 8, 2023

अगोदर स्वतः मास्क लावा…

डिस्क्लेमर – हा सल्ला नाही. संदीप खरेची कविता आवडणं म्हणजे मागासलेपणाचं लक्षण असून त्याला जातीनिहाय लेबल लावणं किंवा महेश काळेच्या गाण्याची टिंगल करणं या गोष्टी मी वाचतो, पाहतो. कलाकार एकदा प्रकाशझोतात आला की त्याला या सगळ्या टीकेला, टिंगलीला आणि अनेकदा हिणकस शेऱ्यांना सामोरं जावंच लागतं. हे occupational hazard आहे. याला […]
March 16, 2023
On Passion & Profession

On Passion & Profession

I find a number of lyricists, singers, musicians who come up to me and say that we want to take this up as a career. While I try not be cynical while giving them any advice, I try to paint as much as a realistic picture of what lies ahead […]
September 30, 2022
Shankar Vaidya at Shubhra Kalya Moothbhar Album Release

दीपस्तंभ

रवींद्र नाट्यमंदिर या मुंबईच्या सभागृहाच्या पुरुषांच्या प्रसाधनगृहात योगायोगाने एका विद्यार्थ्याची भेट एका कवीशी होते आणि अवघ्या ३ मिनिटाच्या कालावधीच्या त्यांच्या संभाषणातून विद्यार्थ्याला त्याच्या आयुष्याचं गमक सापडतं. या एका वाक्यावरून हे एका काल्पनिक कादंबरीच्या ब्लर्बवरील वाक्य आहे असं कुणालाही वाटू शकेल. आणि तरीही हे माझ्याबाबतीत घडलं आहे. २३ सप्टेंबर २०१४. सकाळी […]
August 22, 2022

राजकीय गाण्यांबद्दल एक अराजकीय पोस्ट

राजकीय स्फूर्तिगीतं अथवा मुद्रागीतं करणं हे संगीतकारासाठी अत्यंत आव्हानात्मक तरी सृजनात्मक समाधान (creative satisfaction) देणारं काम आहे. मला सगळ्यात जास्त आवडणारं राजकीय गीत म्हणजे अवधूत गुप्तेने केलेलं शिवसेनेचं पक्षगीत! मुखड्यामध्ये चढत्या क्रमाने ऊर्जा एकत्रित करत जायची आणि मग हुकलाइनला त्या ऊर्जेचा कळस गाठायचा हा बहुतांश राजकीय गाण्यांचा फॉर्म्युला असतो. शिवसेनेच्या […]
August 16, 2022
Shubham Satpute

जराशी हुरहुरही… असू दे!

Reality Shows मध्ये येणाऱ्या गायकांचं नंतर पुढे काय होतं? हा प्रश्न मला अनेकदा अनेक लोकांनी विचारला आहे. त्यातले काही गायक आपल्याला दिसतात आणि काही लोकांची नावं नंतर फारशी ऐकली जात नाहीत. खरं तर या कार्यक्रमांतून झळकलेले सर्व गायक हे आपल्याला रोज दिसत नसले तरी त्यांचं बरं चाललं असतं. काही गायक […]