Marathi

July 25, 2024

आवर्तन – दोन द्वादशींची कहाणी

२३ सप्टेंबर २००३. माझ्या मुलाचा जन्म झाला तो दिवस भाद्रपदातल्या द्वादशीचा होता. अनुरागचा जन्म जरा लवकर झाल्यामुळे त्याला ताबडतोब वांद्र्याच्या गुरूनानक इस्पितळाच्या NICU मध्ये हलवणं गरजेचं होतं. मला डॉक्टरांनी ऑपरेशन थिएटरमध्ये बोलावलं तेव्हा अनुराग रडायचं थांबला होता. डॉक्टरांनी त्याला माझ्या हातात दिलं तेव्हा कंठ दाटून आला. भावनांचा इतका कल्लोळ होता […]
June 7, 2023

प्रार्थना

मी आस्तिक आहे की नास्तिक, या निष्कर्षापर्यंतचा रस्ता सोपा नाही पण रंजक आहे. मी त्यावर चालतो, कधी भलत्याच पायवाटेने जातो, कधी विसावून एका जागी बसतो, कधी उलटा वळून चालू लागतो, कधी एका निष्कर्षापर्यंत पोहोचलोय म्हणून सुस्कारा टाकतो तर पुढे वळणावळणाचा घाटच सुरू झालाय असं आढळतं, तर अनेक वेळा या निष्कर्षापर्यंत […]
May 12, 2023

ढवळल्या आभाळाची नको मागू काही खूण

“चारच ओळी आहेत पण गाणं पूर्ण वाटायला हवं.“ हा एकच विचार माझ्या मनात रेंगाळत होता. कारण आता गाणं रुक्मिणीचं नसून कृष्णाचं होतं. समीरच्या त्या सिटिंग-रूममध्ये बसून तात्त्विक विचार करायला अजिबात वेळ नव्हता. पण कुठलंही सृजन हे मूलतः बौद्धिक (intellectual) नसतं असं माझं अनेक वर्षांनंतर मत झालंय. याचा अर्थ असा नाही […]
April 25, 2023

ओसरला दिनमणी

सगळी वाद्य आणि यंत्र लावून होईपर्यंत तोवर संध्याकाळचे ५ वाजले होते आणि उन्हं उतरायला सुरुवात झाली होती. तापस सरांनी लिहिलेली पहिली कविता पाहिली. शब्द होते – ओसरला दिनमणीफुंकरली तेजवातघणघणला घंटानाददेवळात मंदिरातकृष्णगृही शांततेतअवतरली क्लांत पदे,“बोल सख्या, बोल बोल!”कशी पाहू तुजकडे! – विजय तापस (संगीत अखेरचा रास) दिवस ओसरत चालला तरी श्रीकृष्ण […]
April 23, 2023

अखेरचा रास – प्रस्तावना

जुलैचे दिवस आले की मुंबईच्या महाविद्यालयीन नाटकवेड्या विद्यार्थ्यांना आयएन्टीच्या आंतरमहाविद्यालयीन नाट्यस्पर्धेचे वेध लागतात. या स्पर्धेचा एक नियम असा, की संहिता नवीन लागते. एखाद्या कादंबरीचं अथवा कथेचं रूपांतर चालतं परंतु आधी सादर केलेली एकांकिका या स्पर्धेत चालत नाही. साधारण २००३-२००४चा काळ असेल. प्रा. विजय तापस सरांचा मला फोन आला की रुइया […]
August 22, 2022

राजकीय गाण्यांबद्दल एक अराजकीय पोस्ट

राजकीय स्फूर्तिगीतं अथवा मुद्रागीतं करणं हे संगीतकारासाठी अत्यंत आव्हानात्मक तरी सृजनात्मक समाधान (creative satisfaction) देणारं काम आहे. मला सगळ्यात जास्त आवडणारं राजकीय गीत म्हणजे अवधूत गुप्तेने केलेलं शिवसेनेचं पक्षगीत! मुखड्यामध्ये चढत्या क्रमाने ऊर्जा एकत्रित करत जायची आणि मग हुकलाइनला त्या ऊर्जेचा कळस गाठायचा हा बहुतांश राजकीय गाण्यांचा फॉर्म्युला असतो. शिवसेनेच्या […]
August 16, 2022
Shubham Satpute

जराशी हुरहुरही… असू दे!

Reality Shows मध्ये येणाऱ्या गायकांचं नंतर पुढे काय होतं? हा प्रश्न मला अनेकदा अनेक लोकांनी विचारला आहे. त्यातले काही गायक आपल्याला दिसतात आणि काही लोकांची नावं नंतर फारशी ऐकली जात नाहीत. खरं तर या कार्यक्रमांतून झळकलेले सर्व गायक हे आपल्याला रोज दिसत नसले तरी त्यांचं बरं चाललं असतं. काही गायक […]
February 12, 2022

The Song of Life

The song has the longest life. – Russian Proverb It is said that there is not a single moment in the 24 hours of the day, when a song by Lata Mangeshkar is not being played in some corner of the world. For more than 75 years now, the Mangeshkar […]
January 9, 2022

नुक्कड साहित्य संमेलन

विवेक साहित्य मंच आणि नुक्कड कथाविश्व यांनी आयोजित केलेलं यंदाचं नुक्कड साहित्य संमेलन पुण्याच्या फर्ग्युसन महाविद्यालयात दिनांक २ जानेवारी रोजी पार पडलं. ‘साहित्यसम्राज्ञी शांता शेळके जन्मशताब्दी विशेष’ म्हणून हे संमेलन साजरं केलं गेलं. कौशल संमेलनाच्या शेवटच्या सत्रातल्या संगीताच्या कार्यक्रमासाठी अध्यक्ष म्हणून उपस्थित होता. चैत्राली अभ्यंकर आणि त्यांच्या सहकार्यांनी अतिशय सुंदर […]
December 22, 2021
tabla

शास्त्रीय संगीत आणि तरूण पिढी

मध्यंतरी ‘स्नॉव्हेल’ या बोलक्या पुस्तकांच्या ॲपवर झालेल्या परिसंवादात सहभागी झालो होतो. त्यात विचारलेल्या प्रश्नांना मी जी उत्तरं दिली त्याचं हे संकलन. या परिसंवादात माझ्यासोबत डॉ. आशुतोष जावडेकर आणि विदुषी शुभदा पराडकर सहभागी झाले होते. संपूर्ण परिसंवाद तुम्हाला ‘स्नॉव्हेल’वर ऐकता येईल. १) तरूण पिढीने शास्त्रीय संगीत शिकणं गरजेचं आहे असं तुम्हाला […]