Marathi

December 19, 2021

‘चैत्रबन’ पुरस्कराच्या निमित्ताने

कोव्हिडने काळाच्या मधोमध पाचर मारली आणि काळाचे दोन तुकडे केले. कोव्हिडपूर्व काळ आणि कोव्हिडोत्तर काळ. एका अर्थाने या महामारीने आख्ख्या जगालाच फॅक्टरी रिसेट मारला. जग बदललं.  एक अदृश्य, निर्गुण, निराकार विषाणू – पण इतकं आक्राळविक्राळ रूप धारण करेल याची कुणाला कल्पना होती? हा काळ सगळ्यांनाच जसा कठीण होता तसा तो […]
December 2, 2021
Sant Dnyaneshwar

निळिये निकरे

आज कार्तिक वद्य त्रयोदशी. म्हणजे संत ज्ञानेश्वर महाराज यांचा संजीवन समाधी दिन. त्या निमित्ताने आत्ता संध्याकाळी ६:१५ वा. यूट्यूबला माझ्या वाहिनीवर त्यांची एक विरहिणी! या चालीची एक मजा अशी आहे की ज्या दिवशी ही चाल केली त्याच दिवशी सकाळी सचिन देव बर्मन यांचं ‘ठंडी हवाएँ’ या गीताचा मुखडा घेऊन किती […]
November 8, 2021

पुलंच्या दोन भेटी

दर वर्षी या दिवशी मला पुलंची ही भेट आठवते. चांगलं दोन अडीच तास पुलंच्या सहवासात घालवलेला हा वेळ मला आयुष्यभर पुरेल!‘कवितेला चाली देऊन त्यांचा कार्यक्रम का करावासा वाटला?’ या त्यांच्या प्रश्नाला माझ्यातल्या नवख्या, अतिउत्साही आणि त्यांच्या कौतुकाने हुरळून गेलेल्या संगीतकाराने – “मला काहीतरी वेगळं करायचं होतं” असं त्या वेळी भारी […]
May 11, 2021
Chhand Othatale

छंद ओठांतले – चिरंतनाची क्षणभंगुरता

तुमच्या बाबतीत असं कधी झालंय? की एखादी गाण्याची ओळ, एखाद्या व्यक्तीचं किंवा स्थळाचं नाव, आजचा वार, काल जेवणात कुठला पदार्थ खाल्ला, घराची किल्ली नेमकी कुठे ठेवली – यापैकी कुठला तरी तपशील जाम आठवत नाही… आपण मेंदूला बराच ताण देतो, डोकं खाजवतो, आठवायचा आटोकाट प्रयत्न करतो आणि तरीही आठवणीच्या कुठल्याही खणातून […]
May 6, 2021
Parvardigaar

परवरदिग़ार

‘प्रतिभा’ ही काही सर्वसामान्यपणे आढळणारी गोष्ट नाही. फार म्हणजे फारच कमी कलाकार ‘प्रतिभावंत’ म्हणावे असे असतात. कुठल्याही चांगल्या कलाकाराला कधीतरी या प्रतिभेचा स्पर्श झालेला असतो. कुणाला तोही न होता, प्रतिभेचं नुसतंच ओझरतं दर्शन होतं. पण प्रतिभा (‘जिनियस’ या अर्थी) ही एक चंचल स्वामिनी आहे. कमालीचे प्रतिभावंत कलाकारही तिच्या मर्जीची खात्री […]
May 1, 2021

मराठी अभिमानगीताची आनंदयात्रा

महाविद्यालयात होतो तेव्हाची गोष्ट. तापाची साथ होती आणि त्या साथीत मीही सापडलो. पुढचे दोन दिवस अंथरुणाला खिळून राहणार हे माझ्या ध्यानात येताच या दोन दिवसांत एखादं पुस्तक वाचून होईल असा सकारात्मक विचार माझ्या मनात आला. आमच्या घरात कुठेही एखादं तरी पुस्तक हाताला लागतंच अशी स्थिती असते. जे पहिलं पुस्तक हाताला […]
August 20, 2020
Man Moharale Thumbnail

मन मोहरले – छंद ओठांतले – भाग १७

‘पितृऋण’ चित्रपटाचं संगीत करणं हा माझ्यासाठी एक आनंददायी आणि समाधान देणारा अनुभव होता. नितीश भारद्वाज यांचा दिग्दर्शक म्हणून हा पहिलाच चित्रपट. या चित्रपटातली प्रमुख भूमिका तनुजा यांची होती. तनुजा अनेक वर्षांनी मराठी चित्रपटही करत होत्या आणि एखाद्या चित्रपटात प्रमुख भूमिकाही साकार करत होत्या. त्याची एक छोटीशी गंमत आहे ती सांगतो […]
August 15, 2020
kuni nahi ga kuni nahi

तारकांचे गाणे – छंद ओठांतले – भाग १६

आकाशात तारे सगळ्यांनाच दिसतात. सगळ्यांमधल्या अनेकांना ताऱ्यांनी भरलेल्या आकाशाचा आनंद घेता येतो. त्या अनेकांमधल्या काहींना त्या ताऱ्यांचं वर्णन करता येतं. त्या काहींपैकी मोजक्यांनाच आकाशात या तारका कशा दिसतात यावर कविता लिहिता येते. पण तारकांना आपण कसे दिसतो हे सांगायला मात्र बालकवीच लागतात! भूतलावर माणसं निद्रेच्या कुशीत शिरली की आकाशातल्या सगळ्या […]
August 5, 2020
Unhe Utarali - Grace - Kaushal Inamdar

उन्हे उतरली – छंद ओठांतले – भाग १४

ग्रेसची कविता वाचली आणि मला जाणवलं की अर्थाच्या पलीकडे एक फार मोठी दुनिया आहे. ही दुनिया भासांची आहे, आभासांची आहे, सूक्ष्म जाणिवांची आहे, तीव्र भावनांची आहे, अनाहत नादांची आहे, अमूर्त आकारांची आहे, अनुभवाच्या पलीकडच्या अनुभूतीची आहे, रहस्यांची आहे, साक्षात्कारांची आहे. ग्रेसची कविता वाचली आणि जाणवलं की ही कळण्याची गोष्ट नसून […]
July 28, 2020

झोका मंद झुले – छंद ओठांतले – भाग १२

‘छंद ओठांतले’ या मालिकेच्या मागच्या भागात मी शांता शेळके यांनी लिहिलेल्या ‘रिमझिम बरसत श्रावण आला’ या गाण्याबद्दल लिहिलं होतं. रिमझिम बरसत श्रावण आलासाजण नाही आला असं शांताबाईंनी लिहिलं होतं. शांताबाईंच्या कवितेतला न आलेला साजण हा अनेक वर्षांनंतर त्यांच्या विद्यार्थ्याच्या – म्हणजे अशोक बागवे यांच्या कवितेत आला! एका अर्थाने गुरूच्या प्रश्नाला […]